' व्यक्त होणं ' गरज काळाची





 
आज काल  घडयाळा च्या  काट्यावर चालणाऱ्या
आयुष्यात माणूस सर्व काही व्यवस्थित रित्या पार पाडतो
 शिवाय  ' व्यक्त होणं '....!  शब्द जरी छोटा असला,  तरी माणसावर्  याचं सावट मात्र खूप  मोठ असतं. जन्मा पासुन् ते मृत्यू पर्यंत च्या ह्या खड्तर्  प्रवासात  प्रत्येक् वळणावर   आपल्या अशा जवळ् च्या माणसाची सोबत महत्त्वाची असते.  म्हणून् च आपल्या अशा खास व्यक्ति जवळ् " व्यक्त होणं "  आज काळाची गरज ठरली आहे.. 
आपले विचार, भाव- भावना  ,  सु :ख दुःख, वेदना, त्रास, 
प्रेम ,काळजी , या सर्व गोष्टी वेळेत   'व्यक्त करणे '  खूप गरजेच आहे.  


असं  म्हणतात  कि,   बुद्धि  मधील  निर्माण झालेला गुंता एक  वेळेस  सोडवला  जाऊ शकतो. पण मना मध्ये निर्माण झालेला गुंता सोडवणे अतिशय कठीण. क्रित्येक
 वेळेस काही गोष्ठी, घटना, या माणसाला  आतूनच  त्रास दायक ठरत असतात  . ज्यामुळे माणूस हा केवळ
 बाहेरून च आनंदा चे मुखवटे घालून वावरत असतो. जगाला " माझ्यातला मी " काय आहे कसा आहे. हे कधी ही दाखवून देत नाही. म्हणून  तो  ' व्यक्त न होता ' केवळ एका यंत्रमानवा सारखा कार्यरत् असतो. भावना शुन्य होतो,  विचलित होतो. ह्या  पेक्षा भयानक् एखाद्या साठी काय असावं......?? 





आयुष्य  हि  अशी दैवी देणगी आहे. जी खूप कमी जणांना मिळते. निसर्गात एखाद् फूल  देखील एका 
दिवसा साठी  का होईना उमलत. हव्याचे किती ही  झोके आले. पाउस पडला. ऊन, वारा, थंडी, सर्वाचा सामना करत  उमलत.  सर्वाना  सुगंध देत. थोड्या कालावधी  
नंतर् कोमेजते. पण काही तरी  व्यक्त करते. प्रकट करते. 
माणसाने देखील  हेच सूत्र वापराव.. 


आयुष्य एकदाच मिळतं. आयुष्यात मिळणारी माणसं सुद्धा एकदाच मिळतात. परंतु  आयुष्यात आलेल्या
वाईट अनुभवा मुळे  , वाईट माणसा मुळे चुकी ची निवड  करणे. आणि या संबंधित  कधी ही कोणा ही  जवळ्  
 'व्यक्त न  होणं ' चुकीचं आहे....! आपल्या असण्या चा
नसण्याचा  जगाला फ़रक जरी पडत नसला. तरी आपल्या असण्या मुळे ज्यांच जग सूंदर आहे.. त्यांना 
 नक्की च  फ़रक पडतो...!! 😊

 


म्हणून च...... 


                   व्यक्त व्हा  .....!!! 😇
 



Comments

Popular posts from this blog

याद ❤

#Mohabbat ❤